केडगाव बायपासवर दहशत माजविणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

|  अहमदनगर | दि.11 सप्टेंबर 2024 |  केडगाव-बायपास रस्त्यावर दहशत माजवून खुनी हल्ला करणार्‍या तिघांना कोतवाली पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले आहे. संदिप बाळासाहेब थोरात (वय- ४२ वर्षे, रा. साईनगर, भारत बेकरीमागे बोल्हेगाव, ता. जि. अहमदनगर), कार्तीक संदिप थोरात (वय १८ वर्षे, रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव, ता. जि. अहमदनगर), रोहित संतोष चाबुकस्वार (वय २१ वर्षे, रा.ओम स्वीट पाठीमागे, भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड सावेडी, अहमदनगर) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

👉 शरद पवारांनी घेतले ‘लालबाग राजाचे‘ दर्शन 

उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून चार जणांच्या टोळयाने एकास अमानुष मारहाण करत डोयात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री बायपास रस्त्यावर टोल नायाजवळ घडली. प्रतिक विलास चव्हाण (वय २४, रा. वडगाव गुप्ता) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चव्हाण यांच्या जबाबावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

👉  गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ३५ वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह

फिर्यादीच्या चहाच्या टपरीवर येत आरोपीने फिर्यादीस तू सारखेच माझे वडीलांकडे पैसे का मागतो? असे म्हणाला असता, फिर्यादी त्यास म्हणाले की, माझे पैसे देऊन टाका व माझा हिशोब लिअर करा असे म्हणाला असता, त्याचा राग आल्याने उर्वरीत आरोपींने फिर्यादीस लाकडी दांडके, दगड व प्लास्टीकची खुर्चीने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केली. सदर  गुन्ह्याची माहिती समजताच पोलीस  निरीक्षक प्रताप दारोडे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना आरोपींचा  शोध घेण्यासाठी रवाना केले. 

👉 कोतवाली पोलिसांची कारवाई : चोरट्यांकडून २९ दुचाक्या ताब्यात

शहरातील  विविध   उपनगरात शोध घेत  तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई   पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी  अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि विकास काळे, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार ए. पी. इनामदार, तानाजी पवार, सत्यम शिंदे, नकुल टिपरे, मोहन भेटे, सुजय हिवाळे, सुरज कदम, संकेत धिवर, अनुप झाडबुके, राम हंडाळ, यांनी केली आहे.

👉एमआयडीसी पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा 

Post a Comment

Previous Post Next Post