गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ३५ वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह

| मुंबई | दि. 09 सप्टेंबर |  मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी तिरुअंनंतपुरमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेने खळबळ उडाली. ३२ वर्षीय अभिनेत्रीने गळफास घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

👉 गायक कन्हैया मित्तल काँग्रेसच्या वाटेवर ?

सोमवारी रेंजुशाने सकाळी बराच वेळ बेडरुमचा दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबियांना चिता वाटू लागली होती. त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तेव्हा रेंजुशाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. यामुळे पोलिसांना घटनास्थळी बोलविण्यात आले.

👉 संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी १०९८ टोल फ्री क्रमांक

रेंजुशा ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच काही मल्याळम चित्रपटांमध्येही ती दिसली होती. ‘सिटी ऑफ गॉड’, ‘मैरीकुंडोरु कुंजाडु’ या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. तिच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

👉 कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी 

Post a Comment

Previous Post Next Post