अपघात नियंत्रणासाठी प्रशिक्षित वाहनचालक आवश्यक : मंत्री नितीन गडकरी

 प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

| अमरावती | दि.01 सप्टेंबर 2024 |  देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधणीचे कामे वेगाने सुरु असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे. अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे  निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहनचालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

👉ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत 

मार्डी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता आदी उपस्थित होते.

👉मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ 

देशात राष्ट्रीय महामार्ग जलद गतीने तयार होत असून यामुळे पैसा, पर्यावरण व वेळेत बचत होत आहे. वाहतुकीचा वेग वाढल्यामुळे रस्ते अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येत आहे. यातून प्रशिक्षित वाहनचालक निर्माण करण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे राज्यातील पहिले केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे प्रशिक्षित वाहनचालक तयार होतील, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला. 

👉गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ अनुराधा पौडवाल यांना प्रदान

Post a Comment

Previous Post Next Post