पुण्याला जाण्यासाठी आता 14 लेनचा रस्ता? गडकरींचा प्लॅन काय?

 

| मुंबई | दि.15 सप्टेंबर 2024 | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपला नावा प्लॅन काय आहे ते सांगून टाकले आहे. रिंगरोडमार्गे पुण्याला जोडणार्‍या अटल सेतू सागरी सेतूजवळील नवा १४ लेन रस्ता प्रस्तावीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ५० टक्क्यांनी कमी होईल असे गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले आहे.

👉 पांढरी पुलावर आठा तासामध्ये तीन अपघात परंतु..

विश्वेश्वरय्या यांनी महाराष्ट्रात २८ वर्ष काम केले. त्यानंतर ते गुजरातमध्ये गेले. त्यांनी अनेक मोठी कामे केली. विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त आपण अभिवादन करत आहोत, असे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. सीओईपी टेक्नॉलॉजि युनिव्हर्सिटीने अभियंता दिनानिमित्त आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

👉गुरुवार पासून मान्सूनचा परतीचा प्रवास 

पुढे ते म्हणाले की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जड वाहतूक आहे. त्यामुळे अटल सेतूजवळ १४ लेनचा रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला आणि नंतर रिंगरोडमार्गे बेंगळुरूला जोडला जाईल. या रस्त्यावरील वाहतूक कमी होईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक त्यामुळे ५० टक्क्यांनी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

👉👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

Post a Comment

Previous Post Next Post