शेतकर्‍यांनी फवारणी पंप, कापूस साठवणूक बॅग करीता पोर्टलवर अर्ज करावेत : कृषी विभागाचे आवाहन

| अहमदनगर | दि.06 ऑगस्ट 2024  कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगेचा पुरवठा करण्यात येणार आहे. फवारणी पंपाच्या लाभासाठी ६ ऑगस्ट व कापूस साठवणूक बॅगेकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. 

उड्डाणपूल कामांचा शुभारंभ ; किरण काळेंची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे. यासाठी राज्यशासनाकडून एकात्मिक कापूस आणि सोयाबीन इत्तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालु खरीप हंगाम मध्ये १०० टक्के बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग पुरविण्यात येणार आहे. 

इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणार्‍यास बेड्या! 

या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर वरील बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतक-यांना कापूस साठवणूक बॅग करीता अर्ज करता येतील. तसेच कृषी यांत्रिकिकरण या टाईल्स अंतर्गत शेतक-यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप करिता अर्ज करता येतील. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन ही श्री.बोराळे यांनी केले आहे.

कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील महाराष्ट्राचा अभिमान! 

Post a Comment

Previous Post Next Post