मनपा कर्मचार्‍यांच्या आंदोलनास ठाकरे गटाचा पाठिंबा


 | अहमदनगर| दि.30 ऑगस्ट 2024 |  मनपा कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा प्रश्‍न राज्य शासनाने तात्काळ मार्गी लावावा, यासाठी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आम्ही सत्तेत असताना वारंवार पाठपुरावा करत होतो, नगर शहर शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्यावतीने कर्मचार्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागावा, यासाठी नेहमी प्रयत्न केले जात होते. नगर शहर शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे, असे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी म्हटले. 

👉 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : गटप्रवर्तकांच्या मानधनात... 

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, परेश लोखंडे, मृणाल भिंगारदिवे आदींसह युनियनचे पदाधिकारी बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर आदी उपस्थित होते. तसेच शिवसेना पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेवुन त्यांनी तातडीने कर्मचार्‍यांचा प्रश्‍न मार्गी लावावा,अशी मागणी केली.

👉   शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

संभाजी कदम म्हणाले की, मनपा कर्मचार्‍यांना 2016 पासून सातवा वेतन आयोगाचा प्रश्‍न प्रलंबित असून केंद्र राज्य सरकार व इतर मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचा प्रश्‍न मार्गी लागला. मात्र, नगर मनपाचा प्रश्‍न अद्याप सरकारने सोडविला नाही. मनपा कर्मचारी हे इतर विभागातील कर्मचार्‍यांपेक्षा जास्त काम करीत असून देखील त्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्‍न मार्गी लागत नाही. ही शोकांतिका असून याबाबत सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून कर्मंचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा, असे कदम म्हणाले.

👉 हजारो भगिनींकडून खा. लंके यांना रक्षाबंधनाचे साकडे!

Post a Comment

Previous Post Next Post