या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची अर्थिक मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली. आगीने नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, दिनांक 8 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झाले ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युद्धपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा ५ कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला. माध्यमांशी संवाद साधून त्यांच्यामार्फत त्यांनी कोल्हापूर मधील नागरिकांना आवाहनही केले.