शहरात एक धाव सुरक्षेची, महा मॅरेथॉनमधून दिला सुरक्षेचा संदेश


| अहमदनगर | दि.19 ऑगस्ट 2024 |  नैसर्गिक व मानवनिर्मित विविध आपत्ती संदर्भात जनमानसांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने शहरातील गुलमोहर रोड परिसरामध्ये एक धाव सुरक्षेची या महा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मरॅथॉनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, विद्यार्थींनीनी सहभाग नोंदवत या महा मॅरेथॉनच्या माध्यमातुन सुरक्षेचा संदेश दिला. 

डॉक्टरांच्या देशव्यापी संपाने रुग्णसेवा विस्कळीत

महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या महा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. 

श्रमिक बालाजी महोत्सव निमित्त मिरवणुक संपन्न

शहरातील गुलमोहररोडवर या महा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.  या मॅरेथॉनमध्ये पुरुष व महिला गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या सहभागींना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह  देऊन सन्मान करण्यात आला. 

मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना टोला 

Post a Comment

Previous Post Next Post