सर्व्हर डाऊनमुळे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास अडचण!


| अहमदनगर | दि.08 ऑगस्ट 2024 | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींसाठी शासनाने उपलब्ध केलेले नारी शक्ती ऍप सध्या बंद झालेले आहे. हे ऍप नवीन अर्ज भरण्यासाठी असमर्थता दर्शवित आहे. तांत्रिक अडचण, सर्व्हर डाऊन, असे प्रकार होत आहेत. त्यामुळे लाभार्थींचा हिरमोड होत आहे. अद्यापही अनेक महिला अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. 

जिल्ह्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेची विशेष मोहीम 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शासनाने संकेतस्थळ सुरू केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी अर्ज भरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पोर्टलही योग्य प्रकारे कार्यान्वीत नसल्याचे सांगितले जात आहे. 

विनापरवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड 

दरम्यान, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. मागील आठवड्यापर्यंत प्रशासनाकडे जिल्हाभरातून 7 लाख महिला लाभार्थींचे अर्ज प्राप्त झाले आहेत तसेच या योजनेची गतीने अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. 

आरोग्य जीवन विम्यावरील जीएसटी रद्द करा : संसद भवनाबाहेर आंदोलन 

राज्य सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांपासून अर्ज भरण्यासाठी उपलब्ध असलेले नारी शक्ती ऍप बंद असल्याचे दिसून येत आहे. नवे अर्ज भरताना प्रतिसाद येत नाही. त्यामुळे चार- पाच दिवसांपासून अनेकांना अर्ज भरता येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

शेतकर्‍यांनी फवारणी पंप, कापूस साठवणूक बॅग करीता पोर्टलवर अर्ज करावेत... 

Post a Comment

Previous Post Next Post