मुख्य जलवाहिनी फुटली शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत


| अहमदनगर| दि.13 ऑगस्ट 2024 |  सोमवार दि.12 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या मुख्य जलवाहीनीस नटराज चौक ( जुने आर.टी.ओ. ऑफीस जवळ ) या ठिकाणी गॅस पाईप लाईन टाकणाऱ्या खाजगी ठेकेदाराच्या मशिनचा धक्का लागुन फुटली आहे.

👉लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर  

जल वाहीनीचे दुरुस्तीचे काम महानगर पालिकेने तातडीने हाती घेतलेले आहे.त्यामुळे सोमवारी  संपूर्ण स्टेशन रोड परिसर, सारस नगर व बुरुडगांव रोड परिसर या  भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. या भागास जलवाहीनी दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी वाटप करण्यात येईल.

👉मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना टोला 

तसेच  मंगळवारी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या  मंगलगेट , झेडीगेट , रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी या भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही . या भागास  बुधवारी  पाणी पुरवठा करण्यात येईल. 

👉संभाजी ब्रिगेडची विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेकडे २५ जागेची मागणी 

त्याच प्रमाणे बुधवारी   सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी ,  कापड बाजार खिस्त गल्ली या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास गुरुवार दि. 15 रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल, महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगर महापालिकेने केलेले आहे.

👉२६ ऑगस्ट रोजी संविधान सन्मान महामेळाव्याचे आयोजन. 

Post a Comment

Previous Post Next Post