संभाजी ब्रिगेडची विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेकडे २५ जागेची मागणी

 संभाजी ब्रिगेडची विधानसभा निवडणूकीतसाठी शिवसेनेकडे २५ जागेची मागणी

संभाजी ब्रिगेडची केंद्रीय कार्यकारणीची बैठक संपन्न

| छत्रपती संभाजीनगर | दि.11 ऑगस्ट 2024 |  संभाजी ब्रिगेडची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवार (दि.१० ऑगस्ट) रोजी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृह येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीमध्ये विविध सामाजिक व राजकीय विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. त्या दृष्टीने करण्यात येणारी आंदोलने आणि तयारी त्याचे नियोजन करण्यात आले. लवकरच संभाजी ब्रिगेडचा मेळावा घेण्यात येणार असून आगामी विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी युती आहे. पर्यायाने शिवसेना महाविकास आघाडी सोबत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. संभाजी ब्रिगेडने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेच्या २५ जागेची मागणी केली आहे. 

त्या दृष्टीने मागितलेल्या जागेचा अहवाल तयार करून लवकरच शिवसेना पक्षप्रमुखासोबत बैठक होणार आहे. आणि संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत अर्थात महाविकास आघाडी सोबत संपूर्ण ताकतीनिशी आगामी विधानसभा लढणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.

या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अ‍ॅड.मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे, डॉ. शिवानंद भानुसे, कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, गजानन पारधी, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, संघटन सचिव संदीप कडलक, संघटक बालाजी जाधव, उमाकांत उपाडे, सुयोग औंधकर, दिनेश महाडिक, सुदर्शन तारक, शशिकांत कन्हेरे, गजानन भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.

तर या बैठकीसाठी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे रेखाताई वाहटुळे, रवींद्र वाहटूळे, वैशालीताई खोपडे, रेणुकाताई सोमवंशी आदींनी परिश्रम घेतले असल्याची माहिती महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post