शरद पवार यांची गाडी आडवून आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी


| सोलापूर | दि.11 ऑगस्ट 2024|  शरद पवार सोलापूर (बार्शी) दौर्‍यावर आले असता. यावेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर गाडी अडवल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच शरद पवारांना काळे झेडे देखील दाखवण्यात आले.
 
राज्यभर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून, राज ठाकरेंना घेराव घातल्यानंतर रविवारी सोलापूरमध्ये मराठा बांधवांनी राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची गाडी बार्शीजवळ अडवली. मराठा आरक्षणाबाबत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली. 
 
आंदोलकांनी गाडी अडवताच शरद पवार यांनी दरवाजा उघडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठिंबा आहे, असे म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post