चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबडली

| अहमदनगर | दि.06 ऑगस्ट 2024 | दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन ओरबडून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान सावेडीतील डॉनबॉस्को कॉलनीत घडली. या प्रकरणी किरणज्योत सुखविंद कालरा (वय 21 रा. डॉनबॉस्को कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

...किरण काळेंची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार 

फिर्यादी व त्यांची आई शुक्रवारी रात्री जेवण करून आठ वाजेच्या नंतर चक्कर मारण्यासाठी नेहमीप्रमाणे घराबाहेर गेल्या होत्या. त्या एलएनटी कॉलनीच्या मोकळ्या जागेवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन ओरबडून दुचाकीवरून भरधाव वेगात निघून गेले. 

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून नारायण राणे यांना थेट ... 

फिर्यादी व त्यांच्या आईने आरडाओरडा केला असता नागरिक जमा झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी दुपारी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास शैलेश पाटील करत आहेत.

इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणार्‍यास बेड्या! 

Post a Comment

Previous Post Next Post