२६ ऑगस्ट रोजी संविधान सन्मान महामेळाव्याचे आयोजन.

 

| अहमदनगर | दि.08 ऑगस्ट 2024 | समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, अहमदनगर शहरांमध्ये महायुतीच्या माध्यमातून भव्य असा जिल्हा व्यापी संविधान सन्मान महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून. माऊली संकुल येथे २६ ऑगस्ट रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात येणार असून यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच विधान परिषदेवर शिवाजीराव गरजे, अमित गोरखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीने सत्कार समारंभ देखील आयोजित केलेला आहे.

👉 विनापरवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड 

या मेळाव्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मा. जयदीप कवाडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असून आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष  किरण दाभाडे, ज्येष्ठ नेते नितिन कसबेकर आदींनी दिली.

👉  स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार : राज ठाकरे

तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात विरोधकांनी संविधानाविषयी व संविधान बदलण्याचा उपप्रचार महायुतीच्या विरोधात केलेला होता त्यास प्रत्युत्तर म्हणून हा मेळावा चे आयोजन करण्यात आले असून संविधान बदलण्याची ताकद अद्याप कोणालाच नसल्याची ग्वाही या महामेळाव्यात देण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली.

👉 आरोग्य जीवन विम्यावरील जीएसटी रद्द करा...

Post a Comment

Previous Post Next Post