केदारनाथमध्ये महाराष्ट्रातील १२० भाविक अडकले

| नवी दिल्ली | दि.05 ऑगस्ट 2024 |  केदारनाथमध्ये ढगफुटी झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात भाविक अडकून आहेत, त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ९ हजारपेक्षा जास्त भाविकांना वाचवण्यात यश आले आहे. पण, १००० पेक्षा अधिक भाविक अडकल्याची माहिती आहे.

👉 पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरातील तीन उड्डाणपुलांचे भुमिपूजन

तर, यामध्ये महाराष्ट्रातील १२० भाविकही असल्याची माहिती आहे. जिल्हा रायगडमधील महाड येथून संदीप झानजे यांच्यासह १० जणांचा ग्रुप केदारनाथ येथे यात्रेसाठी गेले होते. त्यापैकी ८ जण हरिद्वार येथे सुखरूप पोहाचले आहेत. गोपाळ पांडुरंग मोरे आणि सुदाम राजाराम मोरे हे केदारनाथ मंदिराजवळील हेलिपॅड येथे अडकले आहेत. 

👉 इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणार्‍यास बेड्या!

त्यांचे समवेत महाराष्ट्रातील इतर साधारण १२० नागरिक त्याठिकाणी अडकले आहेत. यामध्ये महाड येथील दहा ते बारा जण सुरक्षित आहेत. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नसल्याने सगळे थांबून आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने त्यांच्याजवळ संपर्क साधला असून सगळे सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

👉 लाडकी बहिण योजनेसाठी 7 लाख अर्ज प्राप्त

केदारनाथ यात्रेला सुरुवात झाल्यापासून देशभरातून लाखों भाविक यात्रेसाठी उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. मात्र अलिकडे झालेल्या मुसळधार पावसाने मोठे अक्राळ विक्राळ रूप धारण करत मोठे नुकसान केले आहे. अशात केदारनाथ मंदीरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता ठिकठिकाणी बंद पडला आहे.तर अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. 

👉 डॉ.सुजय विखे पाटील उतरणार आता विधानसभेच्या मैदानात 

अशातच या पूर सदृश्य पावसात रायगड जिल्ह्यातील महाड तालुयातील दहा भाविक देखील अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातील आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दोन जण अद्याप अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post