आरोग्य जीवन विम्यावरील जीएसटी रद्द करा : संसद भवनाबाहेर आंदोलन

आरोग्य जीवन विम्यावरील जीएसटी रद्द करा

संसद भवनाबाहेर इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन

 

| नवी दिल्ली  | दि.06 ऑगस्ट 2024 | केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य आणि विमा सेवांवरील जीएसटी वाढवण्यात आला आहे. अशा सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी भुर्दड सहन करावा लागणार आहे.एनडीए सरकारच्या अशा जुलमी कारभाराविरोधात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसद भवन परिसरात आंदोलन करत या निर्णयाला विरोध केला.


यावेळी विरोधी खासदारांनी एनडीए सरकारच्या अशा जुलमी कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार शरद पवार, संजय राऊत, वर्षा गायकवाड, यांच्यासह इंडिया आघाडीतील खासदार उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एक्सवर पोस्ट करत इंडिया आघाडीच्या या आंदोलनाचे फोटो शअर करत आंदोलनाची माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य आणि विमा सेवांवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post