श्रमिक बालाजी महोत्सव निमित्त मिरवणुक संपन्न


 

| अहमदनगर दि.14 ऑगस्ट 2024 | श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या ३१ व्या वार्षिक महोत्सव (ब्रम्होत्सव) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री निवासा गोविंदा, श्री व्यंकटेशा रमणा गोविंदा, श्रमिक निवासा गोविंदाच्या जय घोषात बालाजी उत्सव मुर्तीची मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात नगरमध्ये मिरवणुक काढण्यात आली होती.

श्री माकैडेय मंदिर गांधी मैदाना पासून बालाजी उत्सव मुर्तीच्या आरतीने या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम, रवी दंडी, मंदिराचे अध्यक्ष विनोद म्याना, अशोक इप्पलपेल्ली, राजु येमुल, ज्ञानेश्वर सुंकी, दत्तात्रय कुंटला, राजु गड्डम व श्रमिक बालाजी मंदिर संचालक, कार्यकर्ते, भाविक - भक्त मोठ्या संख्नेने उपस्थित  उपस्थित होते..

श्री श्रमिक बालाजी महिलांचे भजनी मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.सजवलेल्या रथावर स्वार श्री आकर्षक बालाजीची उत्सव मुर्ती मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरली, ढोल पथकावर युवकांनी ठेका धरला होता.तसेच बँड पथक ही सामील झाले होते.माकैडेय मंदिर गांधी मैदानापासून सुरु झालेली मिरवणुक लक्ष्मी कारंजा, अर्बन बँक रोड,कापड बाजार,तेलीखुंट,चितळेरोड येथून मार्गक्रमण करत दिल्लीगेट येथे आली तिथे संध्याकाळची आरती करण्यात आली

सावेडी उपनगरात प्रोफेसर कॉलनी चौक पासून कुष्ठधाम रोडने मार्गक्रमण करत श्रमिक नगर येथील बालाजी मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप झाला.मिरवणुकीत मोठ्या संख्नेने भाविक सहभागी झाले आहे.होते.तर प्रसाद वाटप केले जाते होते,महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेचे सर्व विश्वस्त,कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

 

Post a Comment

Previous Post Next Post