शिर्डी येथील श्री साईनाथ रुग्‍णालयातील नविन अद्यावत अपघात विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न

| अहमदनगर | दि.17 ऑगस्ट 2024 | श्री. साईनाथ रुग्‍णालयातील अपघात आणि अतिदक्षता  विभागाचे लोकार्पण सोहळा श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि अमरा बच्‍चु चॅरिटेबल ट्रस्‍टचे  विश्‍वस्‍त संगला शैषाद्री वासु यांचे हस्‍ते पार पडला.

डॉ.अमरा बच्‍चु एम.डी.पी.एच.डी (यु.एस) यांच्या स्‍मृती प्रित्‍यर्थ  अमरा बच्‍चु चॅरिटेबल ट्रस्‍टचे संस्‍थापक कृष्‍णा कुमार बच्‍चु यांनी श्री साईनाथ रुग्‍णालयात येथे  नविन अद्यावत अपघात विभाग आणि अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी अमरा बच्‍चु चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुमारे दीड कोटी रुपये देणगी दिलेली असुन त्‍यातुन श्री साईनाथ रुग्‍णालयातील अपघात विभाग आणि अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे.

मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकार यावेळी बोलतांना म्हणाले, श्री साईबाबा संस्‍थानच्‍या दोन्‍हीही हॉस्पिटलचे उद्दिष्‍ट हे सर्वांना उत्‍कृष्‍ट आरोग्‍य सेवा अत्‍यल्‍प दरात आणि मोफत पुरविणे हे असुन श्री साईनाथ रुग्‍णालयातील अपघात आणि अतिदक्षता विभागाच्‍या अद्ययावत निर्मीतीमुळे आम्‍हाला उत्‍कृष्‍ट आरोग्‍य सेवा समाजातील गोरगरीब आणि गरजु रुग्‍णांना प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे. यावेळी गाडीलकर यांनी अमरा बच्‍चु चॅरिटेबल ट्रस्‍टचे कृष्‍ण कुमार बच्‍चु यांचे आभार व्‍यक्‍त करुन त्यांच्या वतीने आलेले विश्‍वस्‍त संगला शैषाद्री वासु आणि पंढरीकाश्रय अंकम्‍म कोम्मिनेनी श्रींची मुर्ती देवुन सन्‍मान केला.

यावेळी उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग भिकन दाभाडे, वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक, प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, साईनाथ रुग्‍णालयाच्‍या प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, उप कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग दिनकर देसाई,

 प्र.कामगार अधिकारी रविंद्र नवले, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष, सहा.अभियंता बांधकाम विभाग गणेश  कोराटे, जनसंपर्क अधिकारी रुग्‍णालये सुरेश टोलमारे, बायोमेडीकल इंजिनिअर श्रद्धा कोते, प्रणाली कांबळे, तुषार कुटे, अधिसेविका नजमा सय्यद, मंदा थोरात, यासह दोन्‍हीही हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईनाथ रुग्‍णालयाच्‍या प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ. मैथीली पितांबरे यांनी केले तर सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रुग्‍णालये सुरेश टोलमारे यांनी केले व  बायोमेडीकल इंजिनिअर प्रणाली कांबळे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post