उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

| अहमदनगर/ शिर्डी | दि.10 ऑगस्ट 2024 | राज्याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. मदत व पुनर्वसन, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन मंत्री अनिल पाटील, खा. सुनिल तटकरे, राज्‍य महिला आयोगाच्या अध्‍यक्षा रुपालीताई चाकणकर, आ. आशुतोष काळे आदी उपस्थित होते. 

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल आणि श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post