मनोज जरांगे पाटील - पृथ्वीराज चव्हाण भेट

| जालना | दि. २२ ऑगस्ट २०२४ | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. लोकसभा निवडणुक पार पडल्यावर आता विधानसभेची गणिते जुळवली जात आहेत. यातच मनोज जरांगे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे मात्र अद्यापही गुलदस्यात आहे.


जरांगे पाटील फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीला फायदा झाला आहे हे नाकारुन चालणार नाही. त्यामुळे जरांगे यांच्या भेटी-गाठी सुरू झाल्या आहेत. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावर अनेक तर्क वितर्क लावली जात आहेत.

मनोज जरांगे यांनी निवडणुकीसाठी रणनिती आखायला सुरुवात केली असून विधानसभेत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे २९ ऑगस्ट रोजी ते यासंदर्भातील निर्णयही जाहीर करणार असल्याने आता गाठी भेटींना वेग येताना दिसत आहे. जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या संदर्भात घोषणा करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली होती. ती बैठक रद्द केली,

२९ ऑगस्ट रोजी ठेवलेली बैठक रद्द आणि पृथ्वीराज चव्हाण यांची भेट याचा काही संबध आहे का? मराठा आरक्षण व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली का? किंवा चव्हाण यांनी जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय उलथापालथ तर होणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post