पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पैलवान विनेश फोगट ने रचला इतिहास

| पॅरिस | दि.07 ऑगस्ट 2024 |  पॅरिस येथील ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान विनेश फोगट आणि क्यूबाची पैलवान युस्नेलिस गुझमान यांच्यात उपांत्य फेरीची लढत पार पडली. या अटीतटीच्या लढतीत भारताची पैलवान विनेश फोगट ने इतिहास घडविला आहे.

५० किलो महिला फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात विनेश फोगटनं उपांत्य फेरीत धडक दिली होती. उपांत्य फेरीत विनेश फोगटची लढत क्यूबाची पैलवान वाय. गुझमन हिच्यासोबत होणार आहे.

उपांत्य फेरीत विनेश फोगटनं वाय. गुझमान हिला ५-० असं पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारणारी विनेश पहिली भारतीय पैलवान ठरली आहे.

भारताची पैलवान विनेश फोगट हिने दोन मॅच जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनेश फोगट भारताकडून ५० किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात खेळते. यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा ७-५ पराभव करत विनेश फोगटने उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी विनेश फोगटमध्ये समोर जपानच्या यूई सुसाकीचे आव्हान होते. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकाही सामन्यात पराभूत न झालेल्या युई सुसाकीला विनेश फोगटने पराभूत केले.

Post a Comment

Previous Post Next Post