इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणार्‍यास बेड्या!

 इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणार्‍यास बेड्या!

। छत्रपती संभाजीनगरमधून अटक । साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

। एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

| अहमदनगर | दि.03 ऑगस्ट 2024 |  एमआयडीसी परिसरात सपना ट्रान्सपोर्ट सर्व्हिससमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणार्‍या भामट्याला बेड्या ठोकल्या आहे. छत्रपती संभाजीनगर येथून बेड्या ठोकत पाच लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आवेज कलीम पटेल (वय- 19 वर्षे, रा. अंधारी, ता. सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे. सपना ट्रान्सपोर्ट सर्व्हिससमोर उभ्या असलेल्या टाटा एलपीटी 909 या गाडीतून अज्ञात चोरट्याने ईव्हिऑन कॉपरेशन कंपनीच्या चार इलेक्ट्रीक मोटारी अज्ञात इसमाने चोरुन नेल्या होत्या. याबाबत आकाश नामदेव वाघ (वय-24, धंदा- शिक्षण, रा. नागापूर, ता. जि.अहमदनगर) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली होती.

सदर गुन्ह्याचा तपास करताना एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली. त्यामध्ये गुन्ह्यातील चोरी केलेल्या इलेक्ट्रीक मोटारी ह्या पांढर्‍या रंगाचे पिकअपमध्ये भरुन छत्रपती संभाजीनगर च्या दिशेने गेल्याचे दिसून आले. सदर पिकअपचा नंबर हा खोडलेला होता. त्यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन छत्रपती संभाजीनगरला रवाना करण्यात आले.

एमआयडीसी अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील जवळजवळ 40 सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन सदर पिकअपबाबत माहिती मिळवली. दरम्यान, सपोनि माणिक चौधरी यांना सदर गुन्हा हा आरोपी आवेज कलीम पटेल (रा.अंधारी ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर), कबीर बुढन पठाण (रा. वाळुंज, जि. छत्रपती संभाजीनगर) तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली.

त्यावरुन पोलीस पथक हे छत्रपती संंभाजीनगर येथे जात आवेज कलीम पटेल यास पकडून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला पाच लाखांचा महिंद्रा कंपनीचा पिकअप (नंबर एम एच 20 ई एल 9279) तसेच 65 हजार रुपयांचे ईव्हिऑन कॉपरेशन कंपनीचे चार इलेक्ट्रीक मोटारी असा एकुण 5 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि माणिक चौधरी, पोहेकाँ संदीप चव्हाण, पोहेकाँ गणेश कावरे, पोहेकाँ राजू सुद्रिक, पोना बंडू भागवत, पोकाँ किशोर जाधव, पोकाँ नवनाथ दहिफळे, पोकाँ अक्षय रोहकले, पोकाँ गोरक्षनाथ केदार, मोबाईल सेलचे पोकाँ राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post