‘एमपीएससी’ची रविवारी होणारी परीक्षा लांबणीवर


मुंबई | दि. २ ऑगस्ट २०२४ | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी २५ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र याचदिवशी आयबीपीएसची परीक्षा होणार होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी एका परीक्षेला मुकणार होते. 

👉 हजारो भगिनींकडून खा. लंके यांना रक्षाबंधनाचे साकडे!

तसेच कृषीच्या २५८ जागा याच रविवारी होणार्‍या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेत गुरूवारी राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 

👉 उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

कृषी विभागाच्या २५८ जागा समाविष्ट करण्यासाठी तसेच आयबीपीएस व एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. यासाठी मुलांनी पुण्यात सोमवारी रात्री पासून आंदोलन सुरू केलेे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

👉महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना परीक्षार्थींच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आयोगाची आज बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

👉 https://epaper.evijaymarg.com/

Post a Comment

Previous Post Next Post