उंचखडक बुद्रुकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा...!!


| अकोले | दि.11 ऑगस्ट 2024 | ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय यांच्या संयुक्त विद्यमानाने दैनिक युवा ध्येयचे संपादक लहानू सदगीर यांच्या संकल्पनेतून सालाबादप्रमाणे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणाऱ्या व्यक्तींना अहमदनगर येथे आज रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी युवा ध्येय वर्धापन निमीत्त पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

उंचखडक बुद्रुकचे माजी कार्यक्षम सरपंच विद्यमान उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले मल्टिस्टेटचे संचालक श्री. महिपाल प्रल्हाद देशमुख यांना सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले.

देशमुख यांनी आपल्या शालेय जीवनातच चुलते अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक,सद्गुरु यशवंतबाबा चॅरीटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच तत्कालीन उंचखडक बुद्रुकचे सरपंच अशोकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली "श्री सद्गुरू यशवंतबाबा ग्रामविकास प्रतिष्ठान" च्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरवात करून उंचखडक बुद्रुक व पंचक्रोशीतील तरुणांचे संघटन बांधून तरुणांसाठी, गावकऱ्यांसाठी विविध उपक्रम रबवले.

 

Post a Comment

Previous Post Next Post