डॉक्टरांच्या देशव्यापी संपाने रुग्णसेवा विस्कळीत

| अहमदनगर| दि.17 ऑगस्ट 2024 |  कोलकाता येथील महिला डॉक्टरची बलात्कार करुन हत्या केल्याच्या निषेधार्थ आज डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यामध्ये नगरमधील डॉक्टर सहभागी झाले होते. शासकीय रुग्णालयांसोबतच खाजगी डॉक्टरांच्या संघटनांनी देखील आंदोलन पुकारले आहे. यामुळे ओपीडी बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. नगरमधील डॉक्टरांनी प्रोफेसर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले.

👉 महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी ५ दिवस संप केला. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) सर्व डॉक्टर संघटना, हॉस्पिटल संघटनांनी २४ तासांचा संप पुकारला. डॉक्टरांनी अत्यावश्यक वगळता इतर वैद्यकीय सेवा शनिवारी सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ पर्यंत बंद ठेवली. त्यामुळे रुग्णसेवा शहरातही विस्कळीत झाल्याचे पाहिला मिळाले.

👉 संभाजी ब्रिगेडची विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेकडे २५ जागेची मागणी

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरावर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. ही ९ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी यापूर्वीच संप सुरू केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या आंदोलनात उतरली आहे. दरम्यान, नगरमध्ये डॉक्टरांनी निषेध मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. आज (शनिवार) सकाळी ६ ते उद्या (रविवार) सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांतील सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. बाह्यरूग्ण तपासणी व शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगरमधील रूग्णसेवा विस्कळीत झाली होती.

👉 विळद परिसरात पर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी जेरबंद

कोलकाता येथील घटनेत आरजी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. १५ ऑगस्ट रोजी आरजी कार मेडिकल कॉलेजची जमावाने मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. आंदोलन करणार्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. जमावाने गुन्हा झालेल्या जागेची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सदरचा घटनाक्रम महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत आहे, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे.

👉 https://epaper.evijaymarg.com/edition/39/vijaymarg-04-07-2024

Post a Comment

Previous Post Next Post