अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहील : आयुक्त डांगे

मनपाच्या वतीने प्रोफेसर कॉलनी परिसरात स्वच्छता मोहीम

अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहील : आयुक्त डांगे

| अहमदनगर| दि.17 ऑगस्ट 2024 | शहरामधील विविध भागांमध्ये मनपाच्या माध्यमातून दैनंदिन कामाबरोबरच स्वच्छता मोहीम राबवली जाते, आज तोफखाना पोलीस स्टेशन, प्रोफेसर कॉलेज चौक, कुष्ठधाम रोड ते भिस्तबाग चौक पर्यंत कचरा, माती, गवत, दगड उचलून साफसफाई करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने भारत स्वच्छ अभियान आणि माझी वसुंधरा अभियान मनपाच्या वतीने यशस्वीपणे राबवले जात आहे. 

या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते, तरी नगरकरांनी देखील मनपाच्या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन आपला परिसर स्वच्छ, सुंदर ठेवावा. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहील, असे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.

 मनपाच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशन, प्रोफेसर कॉलनी चौक, कृष्णधाम रोड ते भिस्तबाग चौकापर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, शहर अभियंता मनोज पारखे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, विद्युत विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, स्वच्छता निरीक्षक बीडकर, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post