ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत

 

| पुणे | दि.08 ऑगस्ट 2024 | पुणे- ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेचे आज पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतसाठी आलेल्या युवकांनी तिरंगा उंचावत स्वप्नीलचे स्वागत केले. ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे .आज सकाळी स्वप्निलचे पुणे विमानतळावर आगमन झाले

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकून भारताला गौरव मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसळे याचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. कुसळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील कांबळवाडी गावचा रहिवासी आहेत. त्याचे वडील शाळेत शिक्षक असून आई सरपंच आहे. कुसाळे हे २०१५ पासून मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

स्वप्नील कुसळेने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली आणि २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो टोकियो ऑलिम्पिक २०२०च्या वेळी निवड निकष कमी फरकाने चुकला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीला अधिक महत्त्व दिले जात होते.

स्वप्नीलने एकुण ४५१.४ गुण मिळविले. आज सकाळी स्वप्निलचे पुणे विमानतळावर आगमन झाले त्यावेळी शेकडो चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. यांनतर स्वप्नीलने श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम मध्ये स्वप्निलचे नेमबाजीचा सराव केला होता. म्हणूनच स्टेडियमला भेट देण्यासाठी तो आज दुपारी बालेवाडीला आला. तसेच त्याच्या उत्तुंग कामगिरीला सलाम करण्यासाठी एका विशेष समारंभात त्याचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post