मनोज जरांगे पाटील यांच्याकडून नारायण राणे यांना थेट इशारा

| जालना  | दि.05 ऑगस्ट 2024 | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते नारायण राणे यांच्यावर निशाण साधला आहे. पाटलांनी राणेंना थेट इशारा दिला आहे. मी जर धमकी दिली तर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच फिरता येणार नाही. 

‘मी जर धमकी दिली तर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच फिरता येणार नाही’, असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना दिला आहे. दि.४ ऑगस्ट रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत होते.

राणे पिता-पुत्रांनी केलेल्या टीकेचा मनोज जरांगे यांच्याकडून देखील सातत्याने समाचार घेण्यात येतो. दि.४ रोजी देखील जरांगे पाटील यांनी राणे यांना पुन्हा एकदा टीका करून थेट इशाराच दिला आहे. नारायण राणेंनी किंवा इतर कुणी मला फुकट धमक्या देऊ नयेत. मी कुणालाही भीत नाही असे ते म्हणाले.

मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. माझा मराठा समाजही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार आहे., असं जरांगे म्हणाले.,‘मी जर धमकी दिली तर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच फिरता येणार नाही’, असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खासदार नारायण राणे   यांना दिला आहे.

विजयमार्ग खालील बातम्या वाचा

👉केदारनाथमध्ये महाराष्ट्रातील १२० भाविक अडकले

👉महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल : मुख्यमंत्री

👉 इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणार्‍यास बेड्या! 

 

Post a Comment

Previous Post Next Post