कडीकोयंडा तोडून ११ तोळ्याचे दागिने लंपास


| अहमदनगर | दि.07 ऑगस्ट 2024 | जामखेड रस्त्यावरील भाग्योदय कॉलनी येथे चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. २८ जून ते २ ऑगस्ट या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश गोकुला गुप्ता (रा. भाग्योदय कॉलनी, हल्ली रा. वाघोली, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद  दिली आहे. गुप्ता हे खासगी नोकरी करत असून ते सध्या वाघोली येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे जामखेड रस्त्यावरील घर बंद असताना चोरट्यांनी घराचा व बेडरूमचा दरवाजा   तोडून घरात प्रवेश केला.

घरातील पाच तोळ्याचे नेकलेस,  चार तोळ्याच्या बांगड्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी   चोरून नेले. २ ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली. भिंगार पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोहेकॉ डी. बी. पालवे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post