बसमध्ये चढत असताना महिलेची पर्स पळवली


। अहमदनगर  । दि.03 मार्च । बसमध्ये चढत असताना महिलेच्या पिशवीतून दोन तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण, साडे चार हजार रूपये रोख रक्कम व एक मोबाईल असा 72 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल असलेले पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी सायंकाळी माळीवाडा बस स्थानकावर हा प्रकार घडला.

याप्रकरणी सुनिता चंद्रकांत वर्पे (वय 48 रा. पिंपळवंडी, ता. पाटोटा, जि. बीड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. सुनिता वर्पे यांचा मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे. त्या त्याच्याकडे गेल्या होत्या. तेथून त्या बहिणीकडे पुणे येथे आल्या.

त्या बुधवारी दुपारी पुणे बस स्थानक येथून मूळ गावी पिंपळवंडी येथे जाण्यासाठी कुर्ली ते नगर बसमध्ये बसल्या. त्यावेळी त्यांच्याकडे एक कापडी पिशवी व त्यामध्ये पर्स होती. त्या पर्समध्ये दोन तोळ्याचे मिनी गंठण, मोबाईल, रोख रक्कम होती. त्या सायंकाळी माळीवाडा बस स्थानकावर उतरून तेथे थांबल्या.

काही वेळात तेथे नगर ते अंमळनेर ही बस लागली. त्या बसमध्ये चढत असताना गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी फिर्यादीच्या पिशवीमधील पर्स लंपास केली. पर्सम धील दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post