। पारनेर । दि.02 मार्च । सुपा येथील पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी निलंबित केल्याने सुपा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व व्यावसायिक यांनी फटाके वाजवून जल्लोष केला.
जिल्हा पोलिस दलात झाले मोठे फेरबदल, 48 जणांना नव्या नियुक्त्या
सुपा टोलनाक्यावर एका महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गोकावे यांच्या विरोधात सुपा ग्रामपंचायत व व्यावसायिक यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील व पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रारींचा पाढाच वाचला.यावर नामदार विखे यांनी तातडीने पोलिस अधीक्षक यांना याबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.
राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता ; मार्च ते मे महिन्यात होणार अंगाची लाहीलाही
दरम्यान पोलिस निरीक्षक गोकावे यांना निलंबित केल्याची माहिती मिळताच सुपा शहरात व्यावसायिक यांनी सरपंच पती योगेश रोकडे व उपसरपंच दत्तात्रय पवार, माजी सभापती दिपक पवार यांचा हार घालून व गुलाब गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
घरगुती व व्यवसायिक सिलेंडर महागले
यावेळी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पवार, उद्योजक योगेश रोकडे, उपसरपंच दत्तात्रय पवार,फारूक शेख, सुलतान शेख, बाळासाहेब कोल्हे, बापू सोनूळे, बाळू शिंदे, किन्नो खान, राजू पठारे, एकनाथ औचिते, दिपक दिवटे, जब्बार शेख, चंदू कदम, पिंटू आनंदकर, अमोल पवार, विजय पवार, समिर शेख, बंटी मगर आदी उपस्थित होते.
एमपीएससी परिक्षेत महेश हरिश्चंद्रे राज्यात सातवा
दरम्यान सुपा येथील पोलिस निरीक्षक गोकावे यांनी एका महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेची तात्काळ दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.पोलिस निरीक्षक गोकावे यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे, अशी माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.