घरगुती व व्यवसायिक सिलेंडर महागले


। मुंबई । दि.01 मार्च ।  देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत चालले आहे. यामध्ये आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. 

एमपीएससी परिक्षेत महेश हरिश्चंद्रे राज्यात सातवा

आज पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली असून आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. 

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले

तर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी आता सर्वसामान्यांना 1103 रुपये मोजावे लागणार आहे. अशाप्रकारे होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.

कचर्‍याच्या घंटागाड्यांना लावणार जीपीएस सिस्टीम : डॉ. जावळे 

या निर्णयामुळे स्वयंपाक करण्यासाठी घरगुती तसेच रेस्टॉरंटमध्ये होणार्‍या खर्चात वाढ होईल. म्हणजे घरी स्वयंपाक करून जेवणे आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणे हे दोन्ही आता महागले आहेत.  

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार : मुख्यमंत्री

Post a Comment

Previous Post Next Post