गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने मारहाण


। अहमदनगर  । दि.03 मार्च । रस्त्यात लावलेली गाडी बाजूला काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून पतीला मारहाण करीत पत्नीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दोघा भावांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी दुपारी भिंगारमध्ये घडली.

गळ्यात कांद्याच्या माळा घालून हमी भाव व अनुदानाची मागणी

रोहन व सुजल (दोघे रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. बुधवारी दुपारी 12 वाजता फिर्यादी व त्यांचे पती घराकडे जात असताना दोघे बंधूंनी रस्त्यात गाडी उभी केली होती. ती गाडी बाजूला करण्यास सांगितल्याचा राग आल्याने रोहन व सुजल यांनी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करीत मारहाण केली.

बसमध्ये चढत असताना महिलेची पर्स पळवली 

तसेच फिर्यादीलाही शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. रोहन त्यांना म्हणाला, ‘तुम्हाला दोन मुली आहे, मी तुमच्या मुलींसोबत काय करू शकतो ते बघा व मला बाहेर भेटा, मी तुमचा कार्यक्रमच करतो, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी गणेश कवडे

Post a Comment

Previous Post Next Post