आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृहात स्री अधिक्षक पद त्वरित भरणार : रुपाली चाकणकर
महिला आयोगाच्या वतीने आदिवासी विकास विभागाला आदेश काढावा सुनिता भांगरे च्या मागणीला यश
। अहमदनगर । दि.01 मार्च । राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील व वसतीगृहात बऱ्याच ठिकाणी स्री अधिक्षक पद हे रिक्त तर काही ठिकाणी इतर महिला कर्मचारी हे पद सांभाळत असल्याचे निदर्शनास आले आहे या अनुषंगाने आज महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांची भेट घेऊन महिला आयोगाच्या वतीने राज्यातील सर्व आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृहात स्री अधिक्षक पद हे रिक्त ठेवता कामा नये.
स्वच्छ सर्व्हेक्षण-2023, माझी वसुंधरा 3.0 व स्वच्छता स्पर्धेत ‘नोबल हॉस्पिटल' प्रथम
काही अनुसूचित प्रकार व मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे पद सक्तीचे भरणे आवश्यक आहे.असा आदेश महिला आयोगाच्या वतीने आदिवासी विकास विभागाला काढावा अशी मागणी आज जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिताताई भांगरे यांनी केली मागणीचे पत्र देताच त्यांनी त्यावर शेरा मारत त्वरित आदिवासी विभागाला पत्र पाठवून आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृहात स्री अधिक्षक पद त्वरित भरावे असे सांगितले
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले
शासन कोट्यावधी रुपये आदिवासी आश्रमशाळा शाळा व वसतीगृहांवर खर्च करत असते.परंतु पैठण ता.अकोले जि.अहमदनगर येथील शासकीय आश्रमशाळे मध्ये स्री अधिक्षक पद सहा महिन्यांपासून रिक्त असुन वर्ग ४ ची महिला कर्मचारी ही अधिक्षकेची भुमिका बजावत असल्याचे निदर्शनास आले आहे मुलींच्या समस्या जाणून घेण्यासाठी सक्षम अधिक्षक नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे.
कचर्याच्या घंटागाड्यांना लावणार जीपीएस सिस्टीम : डॉ. जावळे
जवळपास ३१२मुलींना आजारी असल्यामुळे उपचारासाठी घरी पाठवल्या आहेत.ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने सुधारणा होणे अत्यावश्यक आहे.हे भांगरे यांनी चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अकोले च्या महिला उपाध्यक्षा जयश्रीताई देशमुख सह कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे