परजिल्हयातुन कामासाठी आलेल्या कामगाराची आत्महत्या



। अहमदनगर  । दि.05 मार्च । कामासाठी दुसर्‍या जिल्ह्यातून नगरमध्ये आलेल्या 33 वर्षीय कामगाराने भाडोत्री राहात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी नगर तालुक्यातील विळद येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

पत्नीस बेदम मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

अवधूत पांडुरंग एडके (वय 33, रा.साठेनगर,ता. मुदखेड, जि.नांदेड) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. तो काही दिवसांपूर्वीच नांदेड येथून नगरला कामासाठी आला होता. विळद येथील एका ठेकेदाराकडे त्याला कामही मिळाले. त्यामुळे तो विळद येथील पाण्याच्या टाकीजवळ एका खोलीमध्ये भाडेकरू म्हणून राहात होता. 

कांदा व्यापार्‍यांचे हितसंवर्धन करण्याचे काम सरकारचे सुरू : जयंत पाटील

त्याने शुक्रवारी सायंकाळी खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सुज्ञ नगरकरांना कळून चुकलय की 'गंगाधरच शक्तिमान आहे' : किरण काळे 

Post a Comment

Previous Post Next Post