। अहमदनगर । दि.05 मार्च । कांद्याचे भाव पडले असून, शेतकरीही उघड्यावर आला आहे. अशा स्थितीत राज्यातील भाजप सरकार मात्र कांदा व्यापार्यांचे हितसंवर्धन करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.
दरम्यान, भाजपने शिंदे गटाशी केलेली युती महाराष्ट्राला रुचलेली नाही, त्यामुळे निवडणुका घ्यायला भाजप घाबरत आहे, असा दावाही पाटील यांनी केला. सावता परिषदेने आयोजित केलेल्या माळी समाज मेळाव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील नगरला आले होते.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. नगरचे आमदार संग्राम जगताप यावेळी उपस्थित होते. कांद्याचे भाव पडल्याने व शेतकरी अडचणीत आल्याने राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा सभागृहात याबाबत आवाज उठवला.
त्यावेळी सरकारने थातूरमातूर उत्तर दिले व समिती नेमण्याचे आश्वासन दिले. पण अशी समिती नेमून तिच्या बैठका होईपर्यंत लहान शेतकर्याला मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळेच कांदा व्यापार्यांचे हितसंवर्धन करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, असा आरोप करून पाटील म्हणाले, कांदा निर्यात बंदी नाही म्हणून त्यांनी सभागृहात सांगितले आहे.
------
सुज्ञ नगरकरांना कळून चुकलय की 'गंगाधरच शक्तिमान आहे' : किरण काळे
लिंक ओपन करताच तरुणाचे 64 हजार झाले गायब
शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता : मुख्यमंत्री