एमपीएससी परिक्षेत महेश हरिश्चंद्रे राज्यात सातवा

एमपीएससी परिक्षेत महेश हरिश्चंद्रे राज्यात सातवा

। अहमदनगर  । दि.01 मार्च । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020-21चा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, त्यात अहमदनगर येथील महेश शिवाजी हरिश्चंद्रे यांनी राज्य गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक पटाकविला. त्यांची आता उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे.

महेश हरिश्चंद्रे यांनी यापुर्वीही एमपीएससी द्वारे निवड होऊन सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण सुरु असतांनाच त्यांनी सदर परिक्षा दिली होती. त्यामध्येही ते यशस्वी झाले.

अहमदनगर पाटबंधारे विभागातील कर्मचारी शिवाजी हरिश्चंद्रे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नोर, राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post