सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर

चित्ररथाद्वारे योजनांच्या प्रचार, प्रसार चित्ररथाचा

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते शुभारंभ


। अहमदनगर  । दि.04 मार्च ।  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यावतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणा-या चित्ररथास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकुर, माहिती अधिकारी अमोल महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी  योजना समाजातील तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे.  

अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.  जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये दोन चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी हा यावेळी केले आहे.

चित्ररथामध्ये सामाजाजिक न्याय व विशेष विभागाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती उपायोजना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देणे, 

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, मुला मुलींसाठी शासकीय वस्तीगृह, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृह योजना, अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत गाय गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना, 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देणे, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींसाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य ,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा प्रतिकृती योजना यासह इतर योजनांची माहिती या चित्ररथामध्ये देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post