अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर विविध मागण्या संदर्भात धरणे आंदोलन
। अहमदनगर । दि.02 मार्च । अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने स्टेट बँक चौक येथील हेड पोस्ट ऑफिस कारल्या समोर विविध मागण्या संदर्भात धरणे आंदोलन करताना संघटनेचे सचिव आनंदराव पवार, अध्यक्ष एल.एम.बर्डे, कार्याध्यक्ष एस.बी. लंके, खजिनदार एन.के.बिडगर, माजी जिल्हा सचिव नईम जहागीरदार, माजी जिल्हा अध्यक्ष जी.ही.राजगुरू, संजय लंके, संजय परभणी, भीमराज गिरमकर, अशोक बडगर, गणेश जगताप, लक्ष्मण बेर्डे, वाल्मीक जाधव, विलास नेते, बाळासाहेब रसाळ, सुनील भोईटे, बापूराव कांबळे, दत्तू तांबे, विजयकुमार एरंडे, अनिल शिंदे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने अहमदनगर स्टेट बँक चौक हेड पोस्ट ऑफिस कार्यालया समोर विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये प्रमुख मागणी कमलेश चंद्र कमिटीने सुचवल्याप्रमाणे 12.24.36. अतिरिक्त वेतन वाढ देण्यात यावी तसेच डायरेक्टर द्वारा अत्याधिक व अव्यवहारिक टारगेट देऊन जी. डी.एस.चा होत असलेला मानसिक छळ थांबवण्यात यावा
तसेच विभागीय स्तरावर अधिकार्यांकडून गैर कानूनी आदेश काढून टारगेटच्या नावाखाली बदली करणे, धमकी देणे इत्यादी प्रकार थांबवण्यात यावे तसेच जी.डी.एस. कर्मचार्यांच्या रजेच्या काळात बदली कामगार लावण्याची परवानगी देण्यात यावी इत्यादी मागण्या मान्य न झाल्यास येणार्या 16 व 17 मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विभागातील सर्व ग्रामीण डाक सेवक सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
-----
Tags:
Breaking