। अहमदनगर । दि.03 मार्च । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर ते मुंबईला जाणार्या मराठा क्रांती मोर्चाचे काल सायंकाळी नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ ढोलताशांच्या गजरात व फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी गणेश कवडे
नगर मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने दत्ता वामन, बापू ठाणगे, सुरेखा सांगळे, कैलास गहिले, पोपट कांडेकर आदींनी मोर्चाचे नेतृत्व करणारे रमेश केरे यांच्यासह समन्वयक किशोर शिरवळ, माणिक शिंदे, श्री.डांगे यांच्यासह आशा केरे, विजया मराठे, भारती पवार, गौरी चव्हाण आदींचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी अमोल हुंबे, केशव बरकते, विशाल बेरड, किरण उंडे, पप्पू बेरड, भैय्या पठाण, किशोर कुलट आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे धरणे आंदोलन
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रमेश केरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथून सुमारे 150 चारचाकी गाड्यांमधून हजारो मराठा समाजाचे नागरिक मुंबईला गेले आहेत. नगर मध्ये मंगळवारी सायंकाळी या मोर्चाचे आगमन झाल्यावर जुन्या बसस्थानक जवळील यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. नगर मधील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होत मुंबईस रवाना झाले.