। अहमदनगर । दि.05 मार्च । कामाला जाऊ नकोस असे म्हणून 27 वर्षीय पत्नीस तिच्या पतीने शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्क्याने व लाकडी पट्टीने बेदम मारहाण केली. ही घटना तपोवन रोडवरील घडली.
कांदा व्यापार्यांचे हितसंवर्धन करण्याचे काम सरकारचे सुरू : जयंत पाटील
याबाबतची माहिती अशी की मोहिनी या लक्ष्मीराम कन्स्ट्रक्शन येथे अकौंटंट म्हणून काम करतात. त्या घरुन लक्ष्मीराम कन्स्ट्रक्शन येथे कामाला निघाल्या असता त्यांचा पती म्हणाला की, तू कामाला जायचे नाही.
गौरी गोंगे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती
घरीच राहायचे, असे म्हणून त्यांनी मोटारसायकल गाडीची चावी घेवून निघाला. म्हणून त्या म्हणाल्या की गाडी घेऊन जाऊ नका असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली
लिंक ओपन करताच तरुणाचे 64 हजार झाले गायब
व लाकडी पट्टीने त्यांच्या पाठीवर तसेच नाकावर मारुन त्यांना जखमी केले व पती यांनी मोहिनी व त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली व घरातून निघून गेले. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.