राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता
मार्च ते मे महिन्यात होणार अंगाची लाहीलाही
। मुंबई । दि.02 मार्च । गेल्या वर्षी देखील मार्च महिना हा शतकातील सर्वात जास्त उष्ण महिना ठरला होता. यंदा देखील मार्च ते मे दरम्यान उष्णता वाढणार असल्याचा अंदाज हवामन विभागाने वर्तवला आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतेय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला.
फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरला. पुढील तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. मार्च ते मे महिन्यां दरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा धडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अल निनोचा प्रभाव पाहता 2023 वर्ष सुद्धा उष्ण लहरींचे आणि अधिक तापमानवाढीचे राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा फटका पिकांना देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न होत असताना महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात अंगाची लाहीलाही होणार आहे.
राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार असून तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-----
🔆 घरगुती व व्यवसायिक सिलेंडर महागले
🔆 एमपीएससी परिक्षेत महेश हरिश्चंद्रे राज्यात सातवा
🔆 रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले
Tags:
Breaking