महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी गणेश कवडे

 

। अहमदनगर  । दि.02 मार्च । महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या अखेर शिवसेनेकडे आल्या आहेत. सभापतीपदी शिवसेनेचे (ठाकरे गट) नगरसेवक गणेश कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडीची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांची महापौर रोहिणी शेंडगे यांनी सभागृहनेतेपदी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले.


जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी सिद्धाराम सालीमठयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 2)
सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. स्थायी समिती  सभापतीपदासाठी कवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने छाननीनंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी कवडे यांची निवड बिनविरोध होत असल्याची घोषणा केली.

यावेळी स्थायी समितीचे सदस्य विनीत पाऊलबुधे, नजीर शेख, सुनील त्र्यंबके, प्रदीप परदेशी, पल्लवी जाधव, संपत बारस्कर, मंगल लोखंडे यांच्यासह मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, नगर सचिव एस.बी तडवी आदी उपस्थित होते.  दरम्यान या निवडीनंतर सेनाराष्ट्रवादीतील अंतर्गत तडजोडीनुसार महापौर शेंडगे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांना सभागृहनेते पदाचे पत्र दिले.

-------

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे धरणे आंदोलन 

गोकावे यांच्या कारवाईचे फटाके फोडून स्वागत...

जिल्हा पोलिस दलात झाले मोठे फेरबदल, 48 जणांना नव्या नियुक्त्या 

Post a Comment

Previous Post Next Post