गळ्यात कांद्याच्या माळा घालून हमी भाव व अनुदानाची मागणी
राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन
। अहमदनगर । दि.03 मार्च । राष्ट्रीय समाज पक्षाच्या सदस्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले व कांद्याला तीन हजार हमीभाव द्यावा आणि विकलेल्या कांद्यास एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी केली.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हिरकणी ग्रुपतर्फे रुपाली चाकणकर यांचे स्वागत
यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेेशर सलगर, राज्य सचिव रवींद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, नगर जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर, शहर अध्यक्ष चिमाजी खामकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी गणेश कवडे
राज्यात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकर्याने कष्टाने पिकवलेल्या कांद्याने त्याच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक कर्जबाजारी होत आहे. मात्र, सरकार शेतकर्यांना आधार देण्यासाठी काहीच निर्णय घेत नसल्याचा दावा करून याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाने गुरुवारी राज्यभर आंदोलने केली.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे धरणे आंदोलन
सरकारने जर त्वरित कांद्यास तीन हजार रुपये हमीभाव व विकलेल्या कांद्यास एक हजार रुपये अनुदान जाहीर न केल्यास रासप राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे, असा इशारा प्रदेशाध्यक्ष शेवते यांनी दिला.
जिल्हा पोलिस दलात झाले मोठे फेरबदल, 48 जणांना नव्या नियुक्त्या