। अहमदनगर । दि.03 मार्च । नगर जिल्ह्यात एकल महिलांना अनेक समस्या ना तोंड दयावे लागते तरी एकल महिलांच्या विविध समस्या सोडविणे बाबत आपण लक्ष घालावे अश्या मागणीचे निवेदन राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे आदिशक्ती महिला फांडेशनची केली आहे.
यावेळी अध्यक्ष जया पालवे, उपाध्यक्ष अलका आव्हाड, सचिव ज्योती भांड, ज्योती माने, मेघा वरखेडकर, मनीषा काळे, वंदना ढोकणे, वृषाली कोतकर, श्वेता कुलकर्णी, गौरी गोंगे, अंजली चौधरी, आश्विनी फुलसौंदर, मोनिका शिंदे, संगिता गलगले, दिपा जावळे, सिसिलिया मनेल, वर्षा पाचारणे, सुनिता शिंदे, अंजली भवर, ज्योती माने आदी महिला उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे कि, एकल महिलांच्या विविध समस्या. त्यामध्ये प्रामुख्याने पतीच्या निधनानंतर पतीच्या संपत्तीवरवर पत्नीचे नाव लावून सध्या सासरचे लोक त्यांना त्याचा उपभोग घेऊ देत नाही, वाढत्या महागाईमुळे एकल महिलांना मुलांचे शिक्षण, घर प्रपंच चालविणे कठीण जाते. तेव्हा नोकरी-व्यवसायाची संधी उपलब्ध करून दयावेत,
शासकिय नोकरीत एकल महिलांना वयाची अट शिथिल करावीत. बचत गटात एकल महिलांना जास्तीत जास्त स्टोल लावण्यास प्राधान्य दयावत,, घरापासून दारापर्यंत एकल महिलांना पहिल्यासारखा सन्मान मिळावा.सहकार क्षेत्राने जसे कर्ज माफ केले तसेच राष्ट्रीयकृत बँकेने त्याचे कर्ज माफ करावे.
ज्या एकल महिलांना स्वतःचे घर नाही त्यांना मोफत 'घरकुल' योजनेचा लाभ देण्यात यावा. यावर आपण जातीने लक्ष घालू व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन चाकणकर यांनी मंडळाला दिले.
------
💥 गळ्यात कांद्याच्या माळा घालून हमी भाव व अनुदानाची मागणी