। अहमदनगर । दि.05 मार्च । येथील सामाजिक कार्यकर्त्या गौरी गोंगे यांची मानव अधिकार फाउंडेशन, भारत अंतर्गत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी कडून महाराष्ट्र राज्य महिला संरक्षण अहमदनगर जिल्हा महिला सरक्षण महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसे पत्र त्यांना महाराष्ट्र राज्य महिला संरक्षण चेअरमन अनुरिता झगडे यांनी दिले आहे
पत्रात म्हटले आहे कि आपण मानव अधिकार फाउंडेशन, भारत चे नियम व आदेशांचे पालन करीत समाजातील सर्व मानवी उत्पिडीत घटकांना योग्य न्याय मिळवून देण्यास तत्पर असाल तसेच आपल्या कार्यात एकनिष्ठ राहून संविधानिक व न्याय व्यवस्थेच्या नियमानुसार योग्य ती मदत कराल या मध्ये कोणत्याही मानवी अधिनियमाची पायमल्ली होऊ न देता प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यास कायम कर्तव्य दक्ष राहाल.
त्याच्या नियुक्ती बद्दल संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रसाद,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर यांच्यासह नगरमधील अनेकांनी अभिनंदन केले आहे
Tags:
Ahmednagar