लिंक ओपन करताच तरुणाचे 64 हजार झाले गायब


। अहमदनगर । दि.04 मार्च ।  पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी मोबाईलवर आलेली लिंक ओपन करून माहिती भरल्याने तरुणाच्या बँक खात्यातून 64 हजार 500 रुपये ऑनलाईन काढून घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने मारहाण

जनार्दन रमेश ऐनोर (वय 31, रा. झोपडी कॅन्टीन, मूळ रा. कडीत खुर्द, ता. श्रीरामपूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी चार वाजता त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये एक लिंक होती व त्याव्दारे पॅनकार्ड अपडेट करावे, असे त्यामध्ये नमूद होते. 

गळ्यात कांद्याच्या माळा घालून हमी भाव व अनुदानाची मागणी

फिर्यादीने ती लिंक ओपन केली व पॅनकार्ड अपडेट करीत असताना त्यांना एक ओटीपी आला. त्यांनी तो ओटीपी त्या लिंकमध्ये भरला असता काही वेळातच त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून 64 हजार 500 रुपये कपात झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. 

शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता : मुख्यमंत्री

आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी कस्टमर केअरला फोन करून बँक खाते आणि डेबीट कार्ड बंद करून एचडीएफसी बँकेला याबाबत माहिती दिली.

सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा 

Post a Comment

Previous Post Next Post