। अहमदनगर । दि.02 मार्च । जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्हा पोलिस दलात बुधवारी मोठे फेरबदल केले आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांच्या बदल्या ओला यांनी केल्या आहेत. पोलिस निरीक्षक व सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश बुधवारी जारी झाले.
राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता ; मार्च ते मे महिन्यात होणार अंगाची लाहीलाही
पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलल्याने आता प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा झपाट्याने होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बदल्यांची चर्चा सुरू होती. या चर्चेला आता ब्रेक लागला आहे. नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात कर्जत तालुका गाजवणारे चंद्रशेखर यादव यांची पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून,
घरगुती व व्यवसायिक सिलेंडर महागले
तोफखाना पोलिस ठाण्यात जिल्हा विशेष शाखेचे मधुकर साळवे नियुक्त केले गेले आहेत. कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांची जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती केली गेली आहे.
एमपीएससी परिक्षेत महेश हरिश्चंद्रे राज्यात सातवा
जिल्ह्यांतर्गत बदली झालेल्या संबंधित अधिकार्यांना तत्काळ नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक अधिकार्यांनी बुधवारीच दिवसभरात बदली ठिकाणी हजर होऊन पदभार घेतला.