। अहमदनगर । दि.07 फेब्रुवारी 2023 । नगर शहरात स्मार्ट एलईडी प्रकल्पांतर्गत 35 हजार पथदिवे बसवले गेले आहेत व हे पथदिवे बसवण्याआधी मनपाला 70 ते 80 लाखाचे वीजबिल येत होते. पण, काही पथदिवे नादुरुस्त वा बंद असल्याने त्या काळात सरासरी 50 लाखापर्यंत वीज बिल येत होते.
मात्र, शहरात स्मार्ट एलईडी प्रकल्पांतर्गत 35 हजारावर पथदिवे बसवल्यानंतर मनपाच्या वीज बिलात 65 ते 70 टक्के बचत झाली असून, आता मनपाला सुमारे 25 लाखापर्यंत पथदिव्यांचे वीज बिल येते, असे स्पष्टीकरण मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सोमवारी मनपा स्थायी समितीच्या सभेत दिले.
दरम्यान, पथदिव्याच्या ठेकेदाराने करारानुसार काम केले नसल्याने त्याला प्रतिदिन 1 लाखाच्या दंडाचा प्रस्ताव केला आहे. मात्र, आयुक्तांनी त्याला मान्यता दिलेली नाही. आधी प्रकल्प पूर्ण करून घ्या, असे त्यांनी सांगितले असल्याचेही उपायुक्त डांगे यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.
मनपा स्थायी समितीची सभा सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, गणेश कवडे, राहुल कांबळेतसेच नगरसेविका रुपाली वारे, गौरी नन्नवरे, ज्योती गाडे व मंगल लोखंडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुर्हे, सचिन बांगर, नगरसचिव एस. बी. तडवी आदीसह मनपाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
----
📳 दुचाकी आडवुन दाम्पत्याला लुटणारे जेरबंद
📳 जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना
📳 बाळासाहेबांची शिवसेनेच्या उप-जिल्हाप्रमुखपदी आनंदराव शेळके
Tags:
Maharashtra