सावेडी उपनगरातील साई मंदिरात चोरी

सावेडी उपनगरातील साई मंदिरात आठ हजाराची चोरी 

 

। अहमदनगर । दि.16 फेब्रुवारी । सावेडी उपनगरातील निर्मलनगर परिसरात डोकेनगर येथे असलेल्या साईबाबा मंदिरात सोमवारी रात्री चोरी झाली. चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे तीन हजार रुपयांची रोख रक्कम व पाच हजार रुपयांचे अ‍ॅम्लिफायर असा आठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 

यासंदर्भात साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद रावसाहेब काळभोर (वय 48, रा. साईबाबा मंदिरासमोर, डोकेनगर, निर्मलनगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी पावणे आठ वाजता मंदिर पुजारी उदय विठ्ठल देशमुख (रा. पितळे कॉलनी, नागापूर) यांनी मंदिर बंद केले होते. यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दानपेटी फोडून त्यातील सुमारे तीन हजार रुपयांची रक्कम व अ‍ॅम्लिफायर असा आठ हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post